शाहूवाडी मधील मागसवर्गीय समाज बांधवांना सरकारी योजनेचा लाभ देणार - केतन चव्हाण

(प्रतिनिधी कडधे) कडधे ग्रामपंचायतीच्या वतीने हडकी हडवळा येथील मागसवर्गीय समाज बांधवांना घरकुल अतिरिक्त विद्युत वितरण व्यवस्था संविधान भवन व इतर सर्व शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणार असल्याचे अश्वासन उपसरपंच व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तरुण तडफदार नेते केतन चव्हाण यांनी भामाई निवासाच्या गुहप्रवेश कार्यक्रमात उपस्थितीतांना मार्गदर्शन करताना दिले
सदर कार्यक्रम रविवार दिनांक 27-11-2022 रोजी दुपारी 12:30  वाजता वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते बौद्ध विचारवंत मार्गदर्शक महेंद्र थोरात यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला शिंदे भावकी व परीवार यांच्या गर्दीत संपन्न झालेल्या या छोटेखानी कौटुंबिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक निवेदक पत्रकार मुकेश शिंदे यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण प्रबोधनात्मक शैलीत करुन उपस्थितांची मने जिंकली ही केवळ एक घरकुल वास्तु नसून दिवंगत भामाबाई मनाजी शिंदे यांच्या आठवणीचे स्मारक असल्याचे ही मुकेश शिंदे पुढे म्हणाले
संदीप शिंदे संगिता शिंदे यांनी विधिवत बौद्ध धम्म प्रचलित पध्दतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते कार्यक्रमास प्रामुख्याने मुंबईकर शिंदे परीवारातील सदस्यानी उपस्थिती दर्शवली अंजना शिंदे लता शिंदे यशवंत शिंदे शिला शिंदे अरुण शिंदे रोहिणी शिंदे पोर्णिमा शिंदे रीना शिंदे कुसुम शिंदे शैला शिंदे दिनकर शिंदे सुधाकर शिंदे सुरेश शिंदे विनोद ननावरे मनिषा ननावरे निशा देठे संतोष देठे शोभा जगताप बाळू जगताप मंदा भोसले उषा ओव्हाळ आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात बुध्द वंदनेने झाली आणि शेवट स्नेहभोजनाने झाली