खोरिप च्या राष्ट्रीय सरचिटणीस पदावर देशक गिरीशबाबू खोब्रागडे यांची निवड

(चंद्रपूर) रिपब्लिकन पक्ष खोरिप च्या राष्ट्रीय सरचिटणीस पदावर दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते गिरीश बाबू खोब्रागडे यांचे चिरंजीव देशक गिरीश बाबू खोब्रागडे यांची निवड करण्यात आली आहे रिपब्लिकन पक्ष खोरिप चे संस्थापक अध्यक्ष व राज्यसभेचे माजी उपसभापती दिवंगत बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त दि २४ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी शासकीय विश्रामगृहात चंद्रपूर येथे झालेल्या पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीत रिपब्लिकन पक्ष खोरिपची राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पदावर विद्यमान अध्यक्ष,मा आ उपेंद्र शेंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावर प्राचार्य गोपीचंद मेश्राम व मध्यप्रदेशातील माजी मंत्री डोमनसिंग नागपूरे, कोषाध्यक्ष पदावर सत्यजीत खोब्रागडे यांची निवड करण्यात आली आहे अतिरिक्त सरचिटणीस पदी एड रामबिहारी शुक्ला यांची निवड करण्यात आली आहे संघटक सचिव पदावर उत्तमराव गवई यांची निवड करण्यात आली आहे पक्षाचे प्रवक्ते पदांवर डॉ एन व्हि ढोके सर यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन बागडे यांनी. प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.