मी पाहिलेले निस्वार्थी नेते दिवंगत गिरीशबाबू खोब्रागडे


गिरीशबाबू खोब्रागडे हे रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस व राज्यसभेचे माजी उपसभापती दिवंगत बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे लहान बंधू.बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या सावलीत ते रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते म्हणून वाढले त्यांच्यावर बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा प़भाव होता बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या निधनानंतर त्यांचे लहान बंधू शामबाबू खोब्रागडे यांच्यावर पक्षाचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी आली होती त्यावेळी पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार एड दत्ता कट्टी साहेब होते कट्टी साहेब यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आंध्र प्रदेशातील माजी आमदार व विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्या मा जे ईश्वरीबाई यांच्या कडे आली होती आणि २-३ वर्षातच शामबाबू खोब्रागडे यांचे सुद्धा निधन झाले त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पक्षाचे सरचिटणीस म्हणून गिरीशबाबू खोब्रागडे यांची नेमणूक करावी अशी विनंती पक्षाच्या अध्यक्षा मा जे ईश्वरीबाई यांच्या कडे केली होती त्यांनी बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचे लहान बंधू म्हणून सरचिटणीस पदी गिरीशबाबूंची निवड करण्यास नकार दिला मात्र त्यांना सेलम येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या अधिवेशनाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली तर सरचिटणीस पदी गिरीशबाबूंची निवड करण्यात येईल असे आश्वासन दिले होते व त्यानूसार गिरीशबाबू खोब्रागडे यांनी सेलम येथे आयोजित केलेले पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन यशस्वी करण्यासाठी जोमाने मेहनत घेतली व अधिवेशन यशस्वी करुन दाखवले व त्या अधिवेशनात पक्षाच्या अध्यक्षा मा जे ईश्वरीबाई यांनी गिरीशबाबू खोब्रागडे यांची पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली त्यानंतर गिरीशबाबू खोब्रागडे यांनी पक्षवाढीसाठी कामाला झपाट्याने सुरुवात केली त्यांनी राज्यात व राज्याबाहेर वेगवेगळ्या कार्यकर्ते यांना भेटून त्यांना पक्षाचे काम करण्याची विनंती करत होते त्यांच्या प़यत्नाना अल्पावधीतच चांगले यश मिळाले होते मुंबई व परिसरातील मोठ मोठ्या कार्यकर्ते व नेते यांना सुद्धा पक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले मुंबईत पक्षाचे काम जोमाने सुरू झाले होते जयमित्र वाघमारे,एड नानासाहेब वाघमारे, हेमंत मोकळं, राजेश भालेराव, सुनिल गायकवाड,एड आशाताईं लांडगे, असे आम्ही काही सहकारी पक्षात काम करु लागलो होतो आंबिवली येथे मोहाने गाळेगाव येथील पक्षाच्या जुन्या काळातील कार्यकर्ते यांनी एक मोठा कार्यक्रम गिरीशबाबूच्या मुख्य उपस्थितीत आयोजित केला होता आम्ही नव्याने पक्षात प्रवेश केलेले कार्यकर्ते ह्या कार्यक्रमात हजर होतो त्यावेळी आदरणीय गिरीशबाबूंचे भाषण ऐकून प़भावित झालो त्या भाषणात गिरीश साहेब म्हणाले की, ह्या गिरीश खोब्रागडेला विकत घेणारी नोट अजून रिझर्व्ह बँकेत छापली नाही त्यांच्या त्या भाषणामुळे आम्ही कायमचे गिरीश साहेबांशी जोडले गेलो रिपब्लिकन पक्षाचे ऐक्य व्हावे अशी त्यांची इच्छा होती त्यासाठी त्यांनी प़यत्न देखील केले मात्र रिपब्लिकन ऐक्याच्या बैठका सुरू असताना ते खूप आजारी पडले आणि ६ जानेवारी १९९० ला मुंबई मध्ये रिपब्लिकन ऐक्याची जाहीर सभा शिवाजी पार्क मैदानात सुरू असताना रिपब्लिकन ऐक्याचे स्वप्न पाहिलेले नेते गिरीश खोब्रागडे यांचे निधन झाल्याची बातमी आली अतिशय भारावल्या सारखे वातावरण त्यांनी निर्माण केले होते त्यांच्या निधनाने रिपब्लिकन पक्षाची खूप मोठी हानी झाली ती आजही भरून आली नाही गिरीश साहेब कायम आमच्या हदयात राहतील असा जीवाला जीव देणारा निस्वार्थी, त्यागी नेता आज हयात नाहीत मात्र त्यांच्या विचारांवर आम्ही आजही रिपब्लिकन पक्ष खोरिप चे काम निष्ठेने, निस्वार्थीपणे,प़ामाणिक, त्यागी भावनेतून करीत आहोत गिरीश साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन अभिवादक भाऊ निरभवणे अध्यक्ष रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र प्रदेश