साक्री तालुक्यातील भटक्या समाजातील महिलेची दगडाने ठेचून हत्या केल्याप्रकरणी भाजपचे नगराध्यक्ष अग्रवाल व त्यांच्या सहकाऱ्यांना तातडीने अटक करून कडक कारवाई करावी रिपब्लिकन पक्ष खोरिपाची मागणी

मुंबई -धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील भटक्या विमुक्त जाती जमातीतील नाथजोगी डवरी गोसावी समाजातील ३२ वर्षाच्या महिला मोहिनी नितीन जाधव यांना भरचौकात भाजपचे नगराध्यक्ष अग्रवाल व त्यांच्या ३०-४० कार्यकर्त्यांनी दगडाने ठेचून क्रुरपणे हत्या केली आहे ह्या माणूसकीला काळीमा फासणार्या घटनेचा रिपब्लिकन पक्ष खोरिपा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने धिक्कार करतो व भाजपचे नगराध्यक्ष अग्रवाल व त्यांच्या सहकारी यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर एका मागासवर्गीय महिलेची सामूहिकपणे  हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा व हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात यावे व ह्या जातीयवादी गुंडांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पक्ष खोरिपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी केली आहे