कल्याण मध्ये अवतरली शिंदेशाही... कडधे शिंदे भावकीच्या कार्यकारणीवर दिग्गजांची निवड
प्रतिनिधी :रविवार दिनांक 3 सप्टेंबर - 2021 रोजी सकाळी 11:30 वाजता मु मोजे कडधे तालुका खेड राजगुरूनगर जिल्हा पुणे येथील मुंबईस्थित बौद्ध शिंदे भावकी ची महत्वपूर्ण बैठक कल्याण खडकपाडा साई रोड मंगला पार्क येथे पार पडली सदर मिटींग साठी शिंदे भावकी चा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसून आला अनेक विविध ठरावाबरोबर भावकीला एकतेची व गोपनीयतेची शपथ देण्यात आली कडधे गाव गायरान महार वतन ईनामी जमिनीच्या संभाव्य अतिक्रमण प्रकरणावर वक्त्यांनी जोरदार टीका केली व सदर घटनेचा निषेध व्यक्त केला सांगोपांग चर्चा झाली त्यानंतर संपूर्ण जमीनीचे मोजमाप करून अंतर्गत वाटप करण्यात येईल असे जाहीर करण्यात आले तसेच लवकरच मु मोजे कडधे गावी तातडीची महत्वपूर्ण बैठक घेण्याचे ठरले असून सर्वानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले सदर बैठकीत संस्थेची हंगामी कार्यकारिणी ची निवड करण्यात आली प्रसिद्ध डॉ शशिकांत शिंदे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शांताराम शिंदे मंगल आप्पा शिंदे गुलाब शिंदे यांची निवड करण्यात आली कार्याध्यक्ष पदी शंकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली या दिग्गज मान्यवर मंडळी बरोबर कार्यकारणीवर संतोष शिंदे मुकेश शिंदे वैभव शिंदे विजय शिंदे अरूण शिंदे ईत्यादी पदाधिका-याची निवड झाली संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी निधी संकलन मासिक वर्गणी सभासद वर्गणी जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे संस्थेचा कौटुंबिक सस्नेह मेळावा लवकरच संपन्न होणार आसून त्याची तारीख आणि वेळ पुढील बैठकीत जाहीर करण्यात येईल असे संस्थेचे प्रसिद्ध प्रमुख सहचिटणीस पत्रकार मुकेश शिंदे यांनी कळविले आहे संस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकारी याचे समाजातील सर्व थरातून अभिनंदन केले जात आहे