प्रतिनिधी (नागपूर) जेष्ठ रिपब्लिकन नेते मा आमदार उपेंद्र शेंडे साहेब यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी पुन्हा एकदा पत्रकार मुकेश शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली
नागपूर रविभवन येथे नुकतीच राज्य कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे राष्ट्रीय सरचिटणीस देशक खोब्रागडे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी बैठकीत मार्गदर्शन केले दिनांक 29-10-2021 रोजी मुंबई येथील केंद्रीय कार्यालयाच्या नुतनीकरण लोकार्पण सोहळ्यात सहभागी मान्यवरांनी मुकेश शिंदे यांची निवड जाहीर केली
उत्तम प्रभावी वक्ता असलेले मुकेश शिंदे गेली 22 वर्षे आंबेडकरी चळवळीत व पत्रकारितेत कार्यरत असून त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप अँवार्ड - २००९ पुरस्काराने नवी दिल्ली येथे ही सन्मानित करण्यात आले होते
रिपब्लिकन पक्ष गटातटाच्या राजकारणाने पोखरला असला तरी त्यांची तात्विक वैचारिक बैठक अजुन संपलेली नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय विचार रिपब्लिकन पक्षच जीवंत ठेवू शकतो आसे सांगुन मी रिपब्लिकन तुम्ही रिपब्लिकन आपण रिपब्लिकन असा निर्धार मुकेश शिंदे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला