बोलता तारा ने समाजाला बोलते करावे - लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे प्रतिपादन

(प्रतिनिधी) बोलता तारा चे संपादक पत्रकार प्रकाश म्हत्रे यांनी आपल्या पत्रकार क्षेत्रातील अनुभवातून समाजाला बोलत करण्यासाठी प्रबोधन  जनजागृती प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वतंत्र वृत्तपत्र सुरू केले असून त्यांना माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा देतो असे प्रतिपादन लोकनेते माजी खासदार  रामशेठ ठाकूर यांनी मासिक बोलता तारा वृत्तपत्र प्रकाशन सोहळ्यास मार्गदर्शन करताना केले रविवार 10 आँक्टोबर 2021 सकाळी 11:30 वाजता संपन्न झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जेष्ठ पत्रकार व साप्ताहिक भिमसंग्राम चे संपादक मुकेश शिंदे यांनी आपल्या प्रबोधन शैलीत केले व कोरोना काळात रामशेठ ठाकूर यांनी पत्रकारांना केलेल्या सहकार्याबदल त्यांचे जाहीर आभार व्यक्त केले शेवटी खारघर पत्रकार संघाचे अध्यक्ष व जनसभा चे संपादक आप्पासाहेब मगर यांनी उपस्थित सर्वाचे आभार मानले कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार विजय गायकवाड यांच्यासह शंकर वायदंडे प्रमेंद सिंग मयूर बर्वे भागवत निकम सागर चव्हाण शेखर सफानी संदेश सोनमाळे अक्षद म्हत्रे इत्यादी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते