अजित दादा पवार यांना उपेंद्र शेंडे यांनी भेटून दिले मागासवर्गीय समाजाच्या मागण्याचे निवेदन


(मुंबई) शासकीय निमशासकीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे त्या निर्णयामुळे कायमस्वरूपी नोकरीची हमी नाही, किमान वेतन मिळण्याची खात्री नाही, आरक्षणाची तरतूद नाही नव्हे हे आरक्षण संपविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे त्यामुळे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरती करण्याची प्रक्रिया थांबविण्यात यावी व शासकीय निमशासकीय कार्यालयात नोकर भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात यावी व त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात यावा, पदवीपुर्व परदेशी शिक्षणासाठी कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्य सरकारप्रमाणे प्रबुद्ध शिष्यवृत्ती योजना सुरू करावी, अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना पदवी नंतर परदेशी शिक्षणासाठी उत्पन्नाची अट रद्द करण्यात यावी, पदोन्नती आरक्षणाबाबत अनुसूचित जाती जमाती व भटक्या जाती विमुक्त जमाती व इतर मागासवर्गीय घटकांवर अन्याय कारक असा ७ मे २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला शासन निर्णय राज्य सरकारने रद्द करावा व मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांचे पदोन्नतीतील आरक्षण सुरू करावे, राज्यातील अनुसूचित जाती जमातीच्या समाज घटकांवर जातीयवादी लोकांनी केलेल्या अन्याय अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींवर कठोर कारवाई करावी तसेच पिडीतांना कायम स्वरुपी संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात यावा तसेच त्यांना न्यायालयीन प्रक्रियेसाठी समाज कल्याण विभागाच्याकडून देण्यात येणारी आर्थिक मदत तातडीने देण्यात यावी असे आदेश देण्यात यावेत, अंबाझरी तलाव नागपूर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक नुकतेच तोडण्यात आले आहे त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी पसरली आहे तरी अंबाझरी तलाव नागपूर येथे त्याच ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, वृद्ध कलावंतांना पेन्शन सुरू करावी आदी मागण्या सोडविण्यासाठी रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने गेल्या वर्षभरात सातत्याने आंदोलने केली आहेत, पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना आतापर्यंत निवेदन देण्यात आली होती
गुरूवारी मुंबईत रिपब्लिकन पक्ष खोरिप चे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेंद्र शेंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री मा ना अजित दादा पवार यांची भेट घेऊन त्यांना मागासवर्गीय समाजाच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन दिले आहे व निवेदनातील गंभीर विषयावर चर्चा केली त्यावेळी मा ना अजित दादा पवार यांनी वरील निवेदनातील गंभीर विषयावर बैठक आयोजित करण्यात यावी अशी विनंती मा ना धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री यांना लेखी स्वरूपात केली आहे यावेळी शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे, सरचिटणीस जीवन बागडे यांचा समावेश होता