(पेण)- शैक्षणिक सवलती,फ्रिशीप, शिष्यवृत्ती योजना सुरू करावी, साडेचार लाखांचा नोकर भरतीतील अनुषेश तातडीने भरण्यात यावा, पदोन्नतीतील आरक्षण सुरू करावे, खाजगीकरणाच्या, कंत्राटीकरण थांबविण्यात यावे, कामगार विरोधी कायदे रद्द करावेत हे समाजाचे संविधानिक हक्क प्रश्न सोडविण्यासाठी आरक्षण हक्क कृती समितीने लढा सुरू केला आहे ह्या आंदोलनात विद्यार्थी, महिला, सामाजिक, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य समन्वयक व आयबीसेफ चे अध्यक्ष, तसेच कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनिल निरभवणे यांनी केले आहे कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेच्या रायगड विभागाच्या वतीने वौस्ट पैलेस,एस टी पेण डेपो समोर, पेण येथे आरक्षण हक्क कृती समितीची रायगड जिल्हा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी सुनिल निरभवणे यांनी बैठकीच्या अध्यक्षीय भाषणात आवाहन केले आहे तसेच रायगड जिल्ह्यातील कार्यकर्ते यांनी येत्या औगस्ट महिन्यात आरक्षण हक्क परिषद आयोजित करण्यासाठी जोमाने कामाला लागावे असे सांगितले. मा सिद्धार्थ कांबळे कोषाध्यक्ष, आयबीसेफ व राज्य समन्वयक, आरक्षण हक्क कृती यांनी आयबीसेफ ते आरक्षण हक्क कृती समितीच्या आंदोलना बाबत प्रवासाची सविस्तर माहिती दिली औल इंडिया एस सी एस टी बैंक कर्मचारी संघटनेच्या फेडरेशनचे अध्यक्ष मा शरद कांबळे यांनी केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे कर्मचारी असा भेद न करता आरक्षणाच्या सर्व लाभार्थ्यांनी ह्या लढाई मध्ये सहभागी व्हावे व आंदोलन यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे सांगितले यावेळी मा दिगंबर भडकमकर विभागीय वाहतूक अधिक्षक, मध्यवर्ती कार्यालय मुंबई सेंट्रल, युनियन बँक एस सी एस टी संघटनेचे पदाधिकारी सुनिल तांबे,साधना कांबळे,कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेचे एम जी कांबळे, मिलिंद बचूटे, गौतम कांबळे,के डी वाघमारे, दिपक ओहोळ, संजय मोरे, उल्हास कांबळे आदी मान्यवरांनी विचार मांडले बैठकीनंतर कास्ट्राईब रा प कर्मचारी संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर घेण्यात आले यावेळी मा दिगंबर भडकमकर विभागीय वाहतूक अधिक्षक,एम जी कांबळे यांनी मार्गदर्शन केले आहे.बैठकीस मोठ्या संख्येने कर्मचारी, अधिकारी वर्ग उपस्थित होता.
समस्त मागासवर्गीय समाजाच्या संविधानिक हक्कासाठी आरक्षण हक्क कृती समितीचा लढा सुरू*- सुनिल निरभवणे
• Mukesh shinde