(प्रतिनिधी) महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेबआंबेडकरांची यांची १३० वी जयंती १४ एप्रिल २०२१ रोजी जगभर साजरी होणार आसून त्यासाठी केंद्र शासनाने सर्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे त्यामुळे प्रत्येक देशवासियांनी कोविडचे नियम पाळून आपल्या प्रत्येकाच्या घरात आणि मनात भिमजयंती साजरी करावी असे आवाहन भिमसंग्राम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ पत्रकार मुकेश शिंदे यांनी केले आहे अस्पृश्यता भेदभाव दुजाभाव संपवण्यासाठी बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले आसून सामाजिक न्याय समता बंधुत्व हे विचार समाजामध्ये रूजविण्यासाठी फार मोठे मानवतावादी सेवाकार्य केले असल्याचे सांगून आपण संपादकीय करत असलेले भिमसंग्राम हे वृत्तपत्र बाबासाहेबांच्या राष्ट्रप्रेमी पत्रकारितेचा वारसा जतन करत असल्याचे प्रतिपादन ही मुकेश शिंदे यांनी केले ऐका मानवी आयुष्यात जगातील सर्व क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण आणि निर्णायक योगदान देणारे बाबासाहेब जगात सर्वश्रेष्ठ आहे देशातील प्रत्येक नागरिकाच्या घरा घरात आणि मना मनात जो पर्यंत भिमजंयती साजरी होणार नाही तोपर्यंत सामाजिक परिवर्तनाचे हे चक्र पूर्ण होणार नाही असे सांगून मुकेश शिंदे यांनी संपूर्ण देशवासियांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या
भिमजंयती प्रत्येकाच्या मनात आणि घरात साजरी करा - जेष्ठ पत्रकार मुकेश शिंदे
• Mukesh shinde
