चैत्यभूमी झाकली जाईल असे बांधकाम तोडण्यासाठी आलेल्या कामगारांना दगडफेक करीन अशी धमकी देणारे आमदार सदा सरवणकर यांच्यावर कारवाई करावी - भाऊ निरभवणे अध्यक्ष रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र प्रदेश.

(मुंबई) चैत्यभूमी हे विश्व भूषण प .पू. डौ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे लाखांचा जनसमुदाय बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे येत असतो चैत्यभूमी शेजारी भागोजी कीर स्मशानात असलेल्या धर्मशाळेची दुरुस्ती करण्यासाठी स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी महापालिका जी-उत्तर विभागाकडे मागणी केली होती सदर दुरुस्ती करण्यासाठी म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या मार्फत करण्यासाठी महापालिकेने कळवले होते व म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या मार्फत दुरुस्ती करण्याचे काम सुरू आहे सदर दुरुस्ती करताना पर्यावरण विभाग ,सी आर झेड व महापालिका इमारत विभाग यांच्या परवानग्या न घेता बांधकाम करण्यात आले आहे तसेच मुळ धर्मशाळा हौल स्वरूपात होती मात्र स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी चैत्यभूमी झाकली जाईल असे बांधकाम करण्याचे कारस्थान रचले आहे हे लक्षात येताच आंबेडकर चळवळीतील पक्ष संघटनांनी हे बेकायदेशीर बांधकाम तोडण्यासाठी महापालिकेकडे तक्रार केली होती त्याची दखल घेऊन मा अतिरिक्त आयुक्त मुंबई महानगर पालिका यांनी म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून कारवाई करावी असे कळविले आहे त्यानुसार सदरचे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी आलेल्या कामगारांना बांधकाम तोडणे थांबवले नाही तर दगडफेक करीन अशी धमकी स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी दिली आहे लोकप़तिनीधी असलेल्या व्यक्तीने अशी कायदा हातात घेण्याची भाषा करणे धोकादायक आहे स्थानिक आमदार सदा सरवणकर हे जातीयवादी आहेत हे लपून राहु शकत नाही त्यांनी प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला झाकण्यासाठी हा प्रकार केला आहे आमदार सदा सरवणकर पोलिसांच्या समोर दगडफेक करीन असे म्हणतात तेव्हा पोलिस खात्याने त्यांच्या विरोधात सबळ पुरावा असल्याने त्यांना तातडीने अटक करून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी केली आहे जर दादर पोलिस ठाण्यातील अधिकारी यांनी सदा सरवणकर स्थानिक आमदार असल्याने कारवाई करण्यात टाळाटाळ केली तर आंबेडकर अनुयायी या विरोधात जोरदार आंदोलन करील याची पोलिस खात्याने नोंद घ्यावी तसेच सदरचे अनधिकृत बांधकाम तातडीने तोडण्याची कारवाई म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या मार्फत करावी अशी मागणी केली आहे