लॉकडाऊनबाबतचा निर्णय दोन दिवसात घेणार : मुख्यमंत्री*
• Mukesh shinde
“कोरोनाची दहशत गेल्याने आपण गाफील झालो. अजूनही कोरोनाने मात केलेली नाही. आपणत त्यांच्यावर मात करायची आहे. मी सर्व राजकारण्यांना विनंती करतो, कृपा करा जनतेच्या जीवाशी खेळ होईल असं राजकारण करु नका. सरकार जे पावलं उचलत आहे ते जनतेच्या हितासाठी उचलत आहे. आपल्याला जनतेचं जीव वाचवायचं आहे. मी आजसुद्धा लॉकडाऊनचा इशारा देतोय. मी दोन दिवस परिस्थिती बघतोय. आतापासून आपण ठरवूया. ही लाट रोखेलच पुढची लाटही रोखूया”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
