बोरीवली येथील रघुलीला या हॉल मधे मुम्बई मधील 11 व 12 या झोन मधील संपूर्ण महिला पोलीस अधिकारी व महिला कर्मचारी यांचे साठी " फूड अँड ड्रग्स कंज्यूमर वेलफेअर कमीटी महाराष्ट्र, भारत. अंतर्गत " ब्रेस्ट कैंसर " ची काळजी कशी घ्यावी या विषयावर संस्थेच्या महिला साक्षामिकरण अध्यक्ष्य नयना कनाल यांच्या व ब्रेस्ट कैंसर सर्जन श्री. संदीप बिबटे साहेब यांच्या मार्गदर्शना खाली घेण्यात आला.
या कार्यक्रमा मधे महिलानी आपली व आपल्या घरातील व समाजातील महिलानी ब्रेस्ट कैंसर या रोगाबद्दल जनजागृति व काळजी कशी घ्यावी या विषयावर डॉ. संदीप बिबटे यानी सविस्तर माहिती दिली व ज्या महिलांना अश्या समस्या असातिल तर आमच्या संस्थेशी सम्पर्क साधा आमची संस्था " ब्रेस्ट कैंसर " या विषयावर संपूर्ण भारत भर आम्ही काम करत आहोत व त्याचे प्रतिनिधित्व संस्थेच्या नयना कनाल मैडम या करत आहेत.
हा कार्यक्रम संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष्य सुधीर मोरे साहेब व महिलां अध्यक्ष्य नयना कनाल मैडम यांच्या सहकार्याने सम्पन्न झाला.
या कार्यक्रमा मधे संस्थेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. शशिकांत बामणे - सम्मोहन तज्ञ / काउंसलर यानीही मानसिक समस्यावर मात कशी करावी, सक्षम कसे रहावे, चिंता मुक्ति, भय मुक्ति, आत्मविश्वास , व समाजात सक्षमतेने कसे रहावे याचे मार्गदर्शन केले. तसेच आपल्या देशातील महिलांना जर " ब्रेस्ट कैंसर " या समस्या जाणवत असतील तर अश्या महिलानी न घाबरता आमच्या संस्थेशी संपर्क साधा आम्ही आपल्या सेवेशी तत्पर आहोत असे आवाहन डॉ. बामणे यानी दिले.
या कार्यक्रमा मधे धाडसी महिलां पोलीस अधिकारी व महिलां कर्मचारी यांचा मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.
तसेच आपल्या देशात जो ब्रेस्ट कैंसर ही समस्या खूपच वाढते आहे, तेव्हा अश्या समस्या मुलासकट उपटुन टाकन्यासाठी आमची संस्था कटिबद्ध आहे, तेव्हा असे कार्यक्रम व महिलां जनजागृति करण्यासाठी जर कोणत्या संस्था इछुक असतील तर अश्या संस्थानी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन डॉ. बामने यानी केले.
या कार्यक्रमात अनेक महिलां पोलीस अधिकारी, संस्थेचे पदाधिकारी प्रशांत पवार साहेब, उदय स्वामीसाहेब, पवार मैडम तशेच इतर सर्व पदाधिकारी यानी सहभाग घेतला.
अखेरच्या सत्रांत सर्व महिलांना जागतिक महिलां दीनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या,
"" सर्व देशातील महिलानी एकच दिवस साजरा न करता येणारा प्रत्येक दिवस हा महिलां साठी एक पर्वनिच असते त्याचा जास्तीत जास्त आनंद घ्या.. असा विचार डॉ. शशिकांत बामणे यानी सर्व महिलांना दिला.
संपर्क :
डॉ. शशिकांत बामणे - काउंसलर
महाराष्ट्र उपाध्यक्ष : फूड एंड ड्रग्स कन्ज्यूमर वेलफेयर कमीटी, महाराष्ट्र, भारत.
09975875189 / 09511857589
