एस टी को औप बैंकेच्या कर्मचारी सेवानिवृतीचे वय५८ वर्षावरून ६० वर्षं करण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक यांची बदली केली.


  (मुंबई) एस टी को औप बैंकेच्या कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षावरून ६० वर्षं करु नये अशी मागणी कास्टाईब रा प कर्मचारी संघटनेच्या वतीने सातत्याने करण्यात आली आहे सध्या एस टी को औप बैंकेचे पदसिद्ध अध्यक्ष व राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा शेखर चन्ने साहेब हे रजेवर असताना एस टी को औप बैंक लि चे व्यवस्थापकीय संचालक मा विकास जगताप यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे विशेष बाब म्हणजे एस टी को औप बैंक लि मध्ये कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षावरून ६० वर्षे करण्याला बैंकेचे व्यवस्थापकीय संचालक मा विकास जगताप यांनी विरोध केला आहे कारण त्यामुळे एस टी को औप बैंकेवर ८ ते १० कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे .को औप बैंक एम्प्लौईज युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी हा २८ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त होणार आहे व त्याला नोकरी गमावण्याची वेळ येऊ नये म्हणून सत्तेचा दुरुपयोग करून मा विकास जगताप यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे हा मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे यात काही तरी काळे बरे असण्याची शक्यता आहे असा आरोप कास्टाईब रा प कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील निरभवणे यांनी केला आहे दि.१ फेब्रुवारी रोजी एस टी को औप बैंकेची मिटींग सुरू असताना को औप बैंक एम्प्लौईज युनियनचे कार्याध्यक्ष सुनील साळवी यांच्यासह त्यांच्या युनियनचे २५-३० कार्यकर्ते मिटींग हौल मध्ये घुसले व बैंकेचे व्यवस्थापकीय संचालक मा विकास जगताप यांच्या उपस्थितीत बैंकेचे महाव्यवस्थापक लेखा एस एम खान यांना शिवीगाळ केली व त्यांना वरून खाली फेकू अशी धमकी दिली आहे सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सुनिल साळवी व त्यांच्या सहकाऱ्यांवर खात्यामार्फत कारवाई करावी व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा अशी मागणी कास्टाईब रा प कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस यांनी रा प महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व एस टी को औप बैंक लि चे पदसिद्ध अध्यक्ष मा शेखरजी चन्ने साहेब यांच्याकडे केली आहे मात्र त्यानंतर ह्या गुंड प्रवृत्तीच्या विरोधात कारवाई करण्यात आली नाही उलट त्यांचा फायदा करून देण्यासाठी अचानक एस टी को औप बैंक लि चे व्यवस्थापकीय संचालक मा विकास जगताप यांची नागपूर येथे बदली करण्यात आली आहे रा प महामंडळाचे महाव्यवस्थापक (क व औ सं) यांनी ह्या मुद्द्यावर रा प महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व एस टी को औप बैंक लि चे पदसिद्ध अध्यक्ष मा शेखरजी चन्ने हे रजेवर असताना असा चुकीचा निर्णय घेतल्यास कास्टाईब रा प कर्मचारी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे तरी मा विकास जगताप यांची नागपूर येथे झालेली बदली रद्द करावी तसेच एस टी को औप बैंक कर्मचारी यांचे सेवानिवृत्तीचे वय ५८ वर्षावरून ६० वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात येऊ नये अशी मागणी कास्टाईब रा प कर्मचारी संघटनेच्या वतीने सरचिटणीस सुनील निरभवणे यांनी केली आहे