बेस्ट सेवानिवृत्ती प्रामाणिक निष्कलंकीत आयुष्याची शिदोरी

३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर श्री देवानंद अमृतसागर यांनी बेस्ट परिवहन उपक्रमाचा निरोप घेतला शनिवार दिनांक ३०/०१/२०२१ रोजी सभारंभपूर्वक बेस्ट कर्मचारी अधिकारी यांनी आपल्या सहकाऱ्यांला निरोप दिला कर्तव्य बजावताना भूमिकेशी प्रामाणिकपणा जबाबदारीपूर्वक वर्तन व सर्वाशी मैत्रीपूर्ण जिव्हाळयांचे संबध यामुळे ते सर्वचे लाडके व सुपरीचित झाले कुटुंब नातेवाईक मित्र परिवार यांच्याकडून अमृतसागर यांना पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात येत असून त्यांच्या सेवाकार्याचा सर्वत्र गौरव होत आहे मूळ सांगली जिल्हातील तासगाव तालुक्यातील शिरगाव (विसापूर) येथून मुंबईत कामानिमित्त आलेले देवानंद दामू अमृतसागर यांनी कुटुंबप्रमुख म्हणून आपली जबाबदारी व्यवस्थित पार पडली अतिशय मेहनत करून गरिबीतून पुढे आलेले देवानंद यांचे आयुष्य आदर्शवंत व अनुकरणीय आहे प्रेमळ आपुलकीचा मनमिळावू स्वभाव यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व समाजात नावारूपाला आले म्हणतात ना कुठल्याही यशस्वी पुरुषांच्या मागे त्यांच्या पत्नी ची साथ असते त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी कल्पना अमृतसागर यांची त्यांना मोलाची साथ मिळाली त्यांच्या यशात त्यांचा सिंहाचा वाटा आहे आता देवानंद सेवेतून निवृत्त झाले असले तरी समाजाप्रति कुटुंबाप्रति त्यांची तळमळ त्यांना स्वस्थ बसून देणार नाही ती सेवा कधीच केव्हाच खंडीत होणार नाही त्यांचे पुढील आयुष्य निरोगी जावो ते शतायुष्यी होव्होत ही तथागत भगवंत चरणी प्रार्थना करतो

                   - मुकेश शिंदे

सोल्जर कभी रिटायर होते नहीं

लाख तुफान आये रास्ते मुडते नहीं

मंजिल अभी दूर नहीं क्यूँ की देवानंद अभी बुढे हुये नहीं

😃👍