पत्रकाराने पत्रकारितेला सेवाभाव जोपासावा - मुकेश शिंदे

(प्रतिनिधी) व्यवहारिक आणि व्यवसायिक पत्रकारितेच्या नावाखाली पत्रकारितेत ही चंगळवाद सुरू असून त्यात भांडवलदार आणि प्रस्तापिताची मक्तेदारी होत असून त्यातील राष्ट्रवाद राष्ट्र प्रेम व सेवाभाव जोपासायला हवा असे उदगार सा. भिमसंग्राम चे संपादक व खारघर प्रेस क्लब चे अध्यक्ष मुकेश शिंदे यांनी पत्रकार दिनांच्या शुभेच्छा देताना काढले

         देशात एका साचेबद्ध नियोजनबध्द विचारांचे उदातीकरण केले जात असून प्रसार माध्यमाकडुन नि:पक्षपाती रोखठोक व सत्याची कास धरणे अपेक्षित आहे

आपली बांधिलकी संविधान देश लोकशाही व जनतेशी असून नवोदीत पत्रकारांना यांचा विसर पडतअसल्याची खंत मुकेश शिंदे यांनी व्यक्त केली

      डॉ. बाबासाहेब आंबेडकर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या लोकशाहीवादी सेवाभावी पत्रकारितेचा आदर्श का जोपासला जात नाही असा प्रश्न ही मुकेश शिंदे यांनी पत्रकार दिनी उपस्थित केला