*समाज भुषण*
*आद. आयु.सयाजी वाघमारे*
📞 70394 83438
☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️
मुंबई दर्शन म्हणून पर्यटकांना *गेट वे* ला भेट देण्याचे पहिले आकर्षण ठरले आहे . फक्त पर्यटकांनाच नाही तर मुंबईकरांना देखील सहज म्हणून फिरण्यास बाहेर पडले म्हणजे त्यांचे पाय *गेट वे* च्या दिशेने वळतात. त्याचे कारण ही तसेच आहे . *समोर दूरवर पसरलेला अथांग* सागर, पश्चिमेला अस्व रूढ *शिवाजी महाराजांचा पुतळा* आणि पंचतारांकित *ताजमहाल हॉटेलची* भव्य वास्तू
गेट वे च्या तीन दिशा जोडणारा वऱ्हांड्यावर बसून गर्दी करणाऱ्या प्रेक्षकांना सागरा तील *मचवे* , *होड्या* , *लॉचेस* यांचा समुद्र लाटाच्या बरोबर वर-खाली होणाऱ्या खेल बघण्यात वेळेच भान राहत नाही. त्या दिवशी समुद्राला जोडून असलेल्या वऱ्हांड्याच्या गुडघ्या एवढ्या भिंतीवरून समुद्रात डोकावणाऱ्या गर्दीतून एक स्त्री समुदात पडलेली त्या गर्दीने पाहिली.आणि *गेट वे* परिसरातील सर्व गर्दी एका जागी एकवटली . समुद्रात पडलेली तरुण स्त्री , खाली जाते , वर येते , त्याबरोबर गर्दीत आरडा - ओरड होवून कोलाहल माजला होता. बचाव बचाव म्हणून लोकांच्यात ओरड वाढली होती . समुद्रात डोकावून बघणाऱ्यांची जोराची रेटारेटी वाढली होती.
डोकावून बघणाऱ्या गर्दीमधून कोणीतरी धाडसी तरुणाने, समुद्रात उडी घेतल्याचे गर्दीने पाहिले. सर्व वातावरणात सन्नाटा पसरला. सर्वांच्या नजरा त्या तरुणावर रोखल्या होत्या. सराईतपणे पोहत जावून , त्या तरूणाने बुडणाऱ्या तरुणीच्या पाठीमागे हात घालून , तिच्यासह तो समुद्रात गेलेल्या पायऱ्यांच्या दिशेने येऊ लागला . सगळी गर्दी श्वास रोखून ते दृष्य बघत होती.
समुद्राच्या कडेला पायऱ्या जवळ येताच त्या तरुणाने बुडत असलेल्या तरुणीला पुढे केलेल्या दोन हातावर उचलुन तो बाहेर आला . त्याने त्या तरुणीला झोपलेल्या अवस्थेत जमिनीवर ठेवले. मात्र गर्दीत जोराची हलचल सुरू झाली. गर्दीतील कोणी त्याच्या पाठीवर शाबासकीच्या थापा देऊ लागले. त्याचा हात हातात घेऊन हातमिळविण्याची रेटारेटी सुरू झाली . गर्दी वाढू लागली . काही तरुणांनी त्याला उचलून घेतले. त्या उडालेल्या धावपळीत दोन चार जण कुठून तरी हार घेऊन आले होते . ते हार त्याच्या गळ्यात घालण्यासाठी गर्दीला दूर सारीत ते त्याच्या दिशेने सरकत होते.
हातात हार घेऊन आलेले तरुण त्या वीरा जवळ पोहचेपर्यंत तो तरुण सावरला होता. ज्या वेळेला हार घेतलेले हात वर झाले. त्या वेळेला पूर्ण ताकतीने दोन्ही हातांने गर्दीला बाजूला रेटीत तो तरुण ओरडला . बस करो ये बकवास, पहिले मुझे ये बतादो , मुझे पानी में किसने धकेला, म्हणजे पाण्यात पडलेल्या स्त्रीला, डोकावून बघणारी जी गर्दी होती. त्या गर्दी मध्ये पाण्यात डोकावून बघणाऱ्या पैकी हा तरुण एक होता . त्याला कोणीतरी पाठीमागून ढकलून दिल्यामुळे तो पाण्यात पडला. जमेची बाजू म्हणजे तो चांगला पोहणारा होता. त्यांने विचार केला. पडलोच आहोत पाण्यात तर वाचवू या स्त्रीला . तिला वाचवण्यासाठी त्यांने पाण्यात उडी मारली नव्हती. म्हणून तिला वाचवण्याचे श्रेय - क्रेडिट तो घेऊ इच्छित नाही . तो आपल्या भूमिकेशी प्रामाणिक आहे.
ही घटना मी ह्या साठी नमूद केली आहे . कारण बौद्ध समाजात धकला- धकलिमुळे जे पुढे आले , ते पुढारी झाले. कुणाला चांगले भाषण करता येते म्हणून लोकांनी त्याला पुढाऱ्याच्या खुर्चीवर बसविले . हा आपल्या कोकणातला, हा आपल्या विदर्भाचा , हा साताऱ्याचा , हा सांगलीचा म्हणजे संख्याबल जास्त म्हणून पुढारी झाला . कोणी काँग्रेसच्या कोणी भाजपच्या दावणीला स्वतःला बांधून घेतले. तो आपल्या कामाला येईल म्हणून त्याला पुढारी मानले , हे असे पुढारी आपण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी सांगत अप्रामाणिकपणा करतात .
ज्या कोणाला बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे नेतृत्व करायचे आहे ज्या कुणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणून वारसा सांगायचा आहे. त्याने जरूर नेता म्हणून आणि आनुयायी म्हणून वारसा सांगावा . मात्र भूमिकेशी प्रामाणिक राहून !
*बौध्द समाज विचार मालिका* - *प्रत्येक शनिवार*
*पुढील भेट ०६/०२/२०२१*
*प्रसार आणि प्रचार*
*विलास पवार*
📞91 37 66 2424
☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️☄️
