जनार्दन सुतार करोना काळातील देवदूत


 करोना काळात आर्थिक विवंचना प्रत्येकाला भेडसावत असून जो तो प्रत्येकजण स्व:तापुरता विचार करू लागला आहे मी आणि माझे कुटुंब यापलीकडे कोणी सार्वजनिक जबाबदारी स्वीकारायला तयार नाही गोरगरिबांना तर कोणी वालीच उरला नाही सामाजिक बांधिलकी फक्त आणि फक्त बोलण्यापुरती उरली आहे लोक तर एकमेकांचा शारीरिक आणि मानसिक स्पर्श ही टाळू लागले आहे अशा वेळी जनार्दन सुतार नावाचा करोना योद्धा स्वताचे आजारपण बाजूला ठेवून समाजाच्या मदतीला धावला ईदीरानगर तुर्भे नवी मुंबई येथील झोपडपट्टीवासीयांना सर्वतोपरी मदत करताना त्यांनी कधी हातचे काही राखून ठेवले नाही

सुतार दांपत्य हे नेहमी इंदीरानगर परीसरातील जनतेला आपल्या कुटुंबातील एक सदस्य वाटतात पैशाने श्रीमंत झालेली ढिगभर माणस आपण आपल्या अवतीभोवती नेहमी पाहतो परंतु दानत ही प्रत्येकाकडे नसते त्यासाठी माणसाच मन मोठ असावं लागत जनार्दन सुतार यांचे इंदीरानगर परिसरातील जनसंपर्क कार्यालय यांची साक्ष देते मुलांना शिक्षणांचा खर्च वयवृध्द महिलांना आर्थिक मदत तरूणांना रोजगार गरजू बेसहारा लोकांच्या पाठीशी नेहमी ठामपणे  उभे राहणारे सुतार म्हणूनच इंदिरानगर जनतेला आपले देवदूत वाटतात आयौध्या येथील प्रस्ताविक राम मंदिर निर्माण साठी नवी मुंबईतून देणगी देण्यासाठी सुध्दा ते सर्वप्रथम पुढे आले जनसेवा हीच जनार्दनची ईश्वरसेवा ही त्यांची ओळख सर्वश्रुत झाली आहे जे कोणी रंजले गांजले त्यास म्हणावी आपुले या संत तुकारांमाच्या अभंगाच्या ओळी त्यांच्या आयुष्याला साद घालतात करोना आज ना उद्या जाईल परंतु जनार्दनाची ही सेवायात्रा अखंडपणे अविरतपणे चालू राहील

- पत्रकार मुकेश शिंदे (संपादक : सा. भिमसंग्राम)