माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे करणार मार्गदर्शन
विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार पत्रकार दिन साजरा
पनवेल : राज भंडारी
नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय माहिती कार्यालय कोकण विभाग यांच्या सहकार्याने पत्रकार दिन निमित्त आयोजित 'परिसंवाद' २१ व्या शतकातील २१ वे वर्ष आणि आव्हाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून सचिव तथा महासंचालक माहिती व जनसंपर्क, महाराष्ट्र राज्य मा. डॉ. दिलीप पांढरपट्टे, लोकसत्ता वृत्तपत्राचे संपादक मा.गिरीश कुबेर आणि सामाजिक कार्यकर्ते मा. डॉ. विश्वंभर चौधरी हे मार्गदर्शन करणार आहेत. ०६ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ : ३० वाजता पत्रकार दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी या कार्यक्रमाला पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माहिती कार्यालय कोकण विभाग डॉक्टर गणेश मुळे, नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी केले आहे.