संविधान दिनी  आयबीसेफ मागासवर्गीय संघटनांचे मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आक्रोश आंदोलन                  

                                                                  
 (प्रतिनिधी) पदोन्नतीतील आरक्षणापासून मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना वंचित ठेवणारा  अन्याय,  जातीयवाद्याकडून विविध जिल्ह्यांतील मागासवर्गीयांवर अन्याय अत्याचार करण्यात आले आहेत,केंद्र सरकारने केलेले कामगार विरोधी कायदे व सरकारी कंपन्या - सरकारी विभागांचे  खाजगीकरण/कंत्राटीकरण करून आरक्षण संपविणे व वेठबिगारी सुरू करणे,  नवीन शैक्षणिक धोरणात आरक्षण नसणे* इत्यादीविरोधात    
 आयबीसेफ च्यावतीने तसेच राज्यातील अन्य संघटना/संस्था यांनी विनंती अर्ज, निवेदने दिली. तसेच आयबीसेफ  च्यावतीने मा. राष्ट्रपती, मा.पंतप्रधान , मा. मुख्यमंत्री , मागासवर्गीय मंत्री, खासदार, आमदार इत्यादींना  शिवजयंती दिनी (19/2/2020), स्वातंत्र्यदिन (15/8/2020 ), आक्रोश निवेदन
आयबीसेफच्या वर्धापनदिनानिमित्त (13/10/2020) निवेदने देण्यात आली आहेत परंतु त्या अनुषंगाने कोणताही सकारात्मक निर्णय सरकारने अद्याप घेतला नाही किंवा आमच्या समाज घटकांची  बैठकही घेतलेली नाही. पुरोगामी विचाराचे  महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येऊन सुद्धा काही फरक पडत  नाही असे दिसत आहे.
     एकंदरीत सरकारबद्दल  समाजामध्ये तीव्र नाराजी  निर्माण झाली आहे. त्यामुळे SC,ST,VJ,NT,SBC,OBC या सर्व मागासवर्गीय समाज, कामगार, कर्मचारी , अधिकारी यांच्या आयबीसेफ ह्या फेडरेशनच्या वतीने 
26 नोव्हेंबर- भारतीय संविधान दिनाच्या दिवशी मा. उद्धवजी ठाकरे, मुख्यमंत्री महोदय यांचे या सर्व प्रश्नाकडे  लक्ष वेधून घेण्यासाठी व पदोन्नतीतील आरक्षणाच्या प्रश्नी  तात्काळ मंत्री गट व याचिका करणाऱ्या संघटनाची बैठक घ्यावी म्हणून  मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे साय. 4 वाजता आक्रोश धरणे आंदोलन करण्यातआले. प्रथमतः भारतीय संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आहे.  या आंदोलनात प्रामुख्याने  कास्ट्राईब  राज्य परिवहन  कर्मचारी संघटना, म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटना,सिडको बीसी एम्प्लॉईज असोसिएशन, महाराष्ट्र विद्यापीठ मागासवर्गीय कर्मचारी महासंघ , मुंबई विद्यापीठ शैक्षणिक कर्मचारी कल्याण संघटना, शासकीय मध्यवर्ती  मुद्रणालय मागासवर्गीय कर्मचारी संघटना व 
सेंट्रल रेल्वे ऑल बँकवर्ड क्लासेस एम्प्लॉईज युनियन या संघटना चे पदाधिकारी अधिकारी, कर्मचारी, कामगार सहभागी झाले होते. यावेळी सुनिल निरभवने(केंद्रीय अध्यक्ष/राज्य परिवहन), एस के भंडारे(केंद्रीय सरचिटणीस/म्हाडा), सिद्धार्थ कांबळे(केंद्रीय कोषाध्यक्ष/सेंट्रल रेल्वे),नरेंद्र हिरे(केंद्रीय सचिव/सिडको), दीपक मोरे(केंद्रीय सदस्य/महाराष्ट्र विद्यापीठ), हेमंत गांगुर्डे(मुंबई अध्यक्ष/मुंबई विद्यापीठ ) राहुल कांबळे(नवी मुंबई अध्यक्ष/सिडको ), गिरिराज गायकवाड (शासकीय मूद्रणालय), सविता शिंदे (सिडको )इत्यादींची भाषणे झाली. हे आंदोलन यशस्वी  होण्यासाठी विजय पेटारे, नितीन साखरे, गणेश खैरनार,दत्ता कांबळे, शाम सुरवाडे इत्यादींनी परिश्रम  घेतले. 



एस के भंडारे
केंद्रीय सरचिटणीस
*आयबीसेफ*
*All India Backward Classes Employees Federation -Trade Union*