डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती (नारायणगाव) च्या वतीने संविधान दिन साजरा

आज गुरुवार, दिनांक 26 नोव्हेंबर,2020 रोजी नारायणगाव येथील pwd गेस्ट हाऊस येथे २३/२४ मे 1931 रोजी बहिष्कृत हितकरिणी सभेचे दोन दिवशीय अधिवेशन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते, व त्यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर सदर pwd गेस्ट हाऊस मध्ये मुक्कामास होते. त्या प्रसंगाचे औचित्य साधून आजचा संविधान सन्मान दिन  तेथील संविधान प्रस्थाविकेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. 
सदर प्रसंगी नारायणगावचे लोकनियुक्त  सरपंच  मा. योगेश  उर्फ बाबु भाऊ पाटे ग्रामपंचायत  सदस्य राजेश  बाप्ते अनिल खैरे  सुनील  भाऊ वाव्हळ अक्षय (बाळा) वाव्हळ 
अक्षय  रा. वाव्हळ किरण साबळे, तशेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती (नारायणगाव) र जि. मुंबई या संस्थेचे अध्यक्ष मा. शशिकांत भालेराव, सरचिटणीस मा. अशोक बाळसराफ, रमेश बाळसराफ उपस्थित होते. त्या प्रसंगी 
शशिकांत भालेराव यांनी नुकत्याच उपरोक्त संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर स्मरकाविषयी घेतलेल्या डॉ. अमोल कोल्हे खाजदार शिरूर लोकसभा तशेच जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार मा. अतुल बेनके यांना भेटून निवेदन दिल्याचा उल्लेख केला व अशा व्यक्त केला की, खा. डॉ. अमोल कोल्हे, व आ. अतुल बेनके सदर प्रलंबित स्मारकाबाबत शासनाकडे पाठपुरावा करून ह्या pwd गेस्ट हाऊसच्या आवारा मध्ये भव्य स्मारक व समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित होतील, तशेच त्या ठिकाणी भव्य वाचनालय, व्यवसाय मार्गदर्शन, upsc/ mpsc परीक्षेचे मार्गदर्शन अशे विविध उपक्रम राबविले जातील अशी व्यवस्था केली जावी अशी वास्तू उभी रहावी अशी अशा  खा. मा. डॉ.  अमोल कोल्हे यांनी त्यांना निवेदन देताना व्यक्त केली होती.
आपण सर्वजन अशा करू की, थोड्याच दिवसात ह्या pwd गेस्ट हाऊस च्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे भव्य स्मारक उभे राहिले. 
जयभीम !!!