(प्रतिनिधी)_________________________ रिपब्लिकन पक्ष खोरिपच्या परभणी जिल्हा अध्यक्ष पदी भिमराव कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे दि ४ नोव्हेंबर २०२० दुपारी भैय्यासाहेब आंबेडकर नगर वांगी रोड, परभणी येथे रिपब्लिकन पक्ष खोरिपच्या मराठवाडा प़देश अध्यक्ष मा हरिभाऊ मांजरमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस दिवंगत बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प़ती आदर व्यक्त करून तसेच रिपब्लिकन पक्ष खोरिप चे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेंद्र शेंडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पक्ष बांधणीसाठी मराठवाडा प़देश अध्यक्ष मा हरिभाऊ मांजरमकर हे प़यत्नशील आहेत त्याचाच एक भाग म्हणून परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन पक्ष खोरिप मध्ये प़वेश करण्याचा निर्णय घेतला होता व त्यासाठी आयोजित बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांच्या समवेत चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे रिपब्लिकन पक्ष खोरिप च्या परभणी जिल्हा कार्याध्यक्ष पदी अशोक कांबळे यांची व सरचिटणीस पदी संदीपान गालफाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्ष खोरिप मराठवाडा प़देश अध्यक्ष मा हरिभाऊ मांजरमकर यांनी दिली आहे
रिपब्लिकन पक्ष खोरिपच्या परभणी जिल्हा अध्यक्ष पदी भिमराव कांबळे यांची नियुक्ती
• Mukesh shinde