खारघरच्या तरुणांकडून तयार केलेल्या सिंहगड किल्ल्याच्या प्रतिकृतीचे व जनजागृतीचे कौतुक

(प्रतिनिधी) खारघर


दि.१५ नोव्हेंबर,२०२०


आजच्या मोबाईल युगात व आधुनिकीकरणामुळे तरुण पिढी व बच्चे कंपनी भारतीय संस्कृती, परंपरा व इतिहास विसरू पाहत आहेत.
किल्ले बनविणे ही आपल्या महाराष्ट्राची जुनी परंपरा आहे.हे किल्ले म्हणजे राजे महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत.
*ज्याचे किल्ले त्याचे राज्य* ह्या संकल्पनेतून धर्माचे रक्षण आपल्या महाराजांनी केले. महाराष्ट्राचा मराठमोळा इतिहास, छ. शिवाजी महाराज यांची थोरवी, संस्कृती व परंपरेची आठवण किल्ल्यांच्या साक्षीने जागृत करावी म्हणून किल्ले बनवून त्याप्रती आपली आत्मीयता प्रकट करणे व आपले दिवाळीतील लहानपण जागे करण्याचा प्रयत्न करावे ह्या विचाराने खारघर मधील युवकांनी एकत्र येऊन सचिन तेंडुलकर मैदान सेक्टर २१ या ठिकाणी सिंहगड किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती तयार केली आहे.
किल्ल्याचे संगोपन, संवर्धन व त्याचे महत्त्व नागरिकांना समजावे ह्याच ध्येयाने दीपावलीच्या निमित्ताने जनजागृती करीत आहेत.


अर्जुन घाटगे,चैतन्य झांजले, राकेश थोरात,ओंकार भोसले, साहिल वारंग,ऋषि कांबळे, अभी कांबळे, हर्षद भोसले,आणि मित्र परिवार खारघर यांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.त्यांचे सर्व क्षेत्रातून कौतुक होत आहे..