नारायणगाव शासकीय विश्रामगृहाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात रूपांतर करा-खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना साकडे

(प्रतिनिधी) दि. 23 व 24 मे 1931 रोजी मौजे नारायणगाव ता.जुन्नर येथे  पुणे जिल्हा बहिष्कृत परिषदेचे पाहिले अधिवेशन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले होते. त्या निमित्त डॉ. बाबासाहेबांचे वास्तव्य नारायणगाव येथील शासकीय विश्रामगृहात होते. या विश्रामगृहाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात रूपांतर करावे अशी मागणी गेल्या दहा वर्षा पासून " डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती मुंबई (नारायणगाव) रजि. या संस्थेच्या वतीने राज्य शासनाकडे करीत आहोत. आज दि. 15/11/2020 रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघासाचे खासदार मा. डॉ. अमोल कोल्हे यांची नारायणगाव येथील कार्यालयात प्रत्यक्ष भेट घेऊन संस्थेचे अध्यक्ष शशिकांत भालेराव, सरचिटणीस अशोक बाळसराफ, उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे, चिटणीस किशोर देठे, का. स. विनीत लवंदे,यांचे हस्ते निवेदन देऊन चर्चा केली, या प्रसंगी  रमेश बाळसराफ, विजय बाळसराफ, सचिन खरात,तेजस बाळसराफ, आशिष बनसोडे, अभिजित बाळसराफ, विशाल बाळसराफ, कुणाल बाळसराफ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.