हाथरस घटनेमधील दोषींवर त्वरीत कारवाई करा रिपब्लिकन (गवई गटाचे) मुंबई जिल्हाधिकाऱ्यांच्या निवेदन 

(प्रतिनिधी मुंबई) उत्तर प्रदेश मधील हाथरस येथील मनिषा वाल्मिकी या मागासवर्गीय तरूणीवर आत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) मुंबई प्रदेश अध्यक्ष मा. आनंद खरात यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई जिल्हाधिकारी यांना भेटून पक्षाच्या वतीने मागणीचे निवेदन दिले सदरप्रसंगी पक्षाचे. वरळी विधानसभा अध्यक्ष प्रसाद साळसकर खजिनदार धनंजय थोरात , राजकुमार यादव , प्रशांत भिसे , जितेंद्र फुलपगारे,दिपक भोसले, आर्जून वेगडा इ  पक्षाचे मुंबई प्रदेश पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.