रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अँड वासुदेवराव बागडे काळाच्या पडद्याआड

नागपूर- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय नेते ,माजी मध्य प्रदेश अध्यक्ष, खोरीपा चे माजी कार्याध्यक्ष,अतिरिक्त जनरल सेक्रेटरी अशा विविध पदावर कार्यरत ऍड वासुदेवराव बागडे सौंसर मध्य प्रदेश यांचे वयाच्या 80 व्या वर्षी आज दि .२०ला त्यांचे राहाते घरी दीर्घ आजाराने निधन झाले. रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीत ते बॅ राजाभाऊ खोब्रागडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत होते त्यानंतर त्यांनी रिपब्लिकन पक्षाचे अनेक पदावर काम केले,तीनदा विधानसभा व एकदा लोकसभा निवडणुकीत उभे होते काही काळ मध्य प्रदेश शासन श्रम कल्याण बोर्ड वर सदस्य म्हणून काम केले,रिपब्लिकन पक्षाच्या सम्पूर्ण घडामोडी चे साक्षीदार होते मध्य प्रदेश बालाघाट येथून १९७८ ला खोरीपा चे कचरूलाल जैन यांना खासदार व डोमनसिंग नागपुरे याना तीनदा आमदार म्हणून निवडून आणण्यात शिहाचा वाटा होता, अशा एकनिष्ठ व प्रामाणिक नेत्याला आज शेवटचा निरोप देताना सौंसर येथे भव्य अंत्य यात्रा निघाली व मोक्षधाम येथे आयोजित शोक सभेच्या अध्यक्ष स्थानी  माजी आमदार तथा खोरीपा चे राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र शेंडे होते,ह्यावेळी नागपूर चे पालक मंत्री डा नितीन राऊत, सौंसर चे नगराध्यक्ष संजय राठी,बौद्ध महासभेचे राष्टीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील,आमदार विजय चौरे, माजी मंत्री नाना मोहोड, माजी नगरसेवक मुरली मेश्राम, सुर्यभानजी शेंडे,राजन वाघमारे, जिंदा भगत,घनश्याम पुसे,अविनाश धमगाये,चंद्रामनी गजभिये  भीमराव फुसे ,चंद्रभान बागडे,बालकृष्ण सोमकुवर,यांनी आपल्या शोकसवेदना व्यक्त केल्या अंत्ययात्रेत फार मोठा आप्त परिवार उपस्थित होता, त्यांचे पश्चात पत्नी,मुल वं मुली नातवंडे आहेत,