हाथरस हत्याप्रकरणी रिपब्लीकन जनतेचे निषेध आंदोलन

(मुंबई प्रतिनिधी) उतर प्रदेश हाथरस येथे मनिषा वाल्मिकी या तरूणीवर आत्याचार करणार्या नराधमांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी रिपब्लीकन जनतेच्या वतीने १२ऑक्टोंबर  रोजी चैत्यभूमी दादर मुंबई येथे निषेध मार्च काढण्यात आला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोज भाई संसारे व रिपब्लिकन पक्ष (गवई गट) मुंबई प्रदेश अध्यक्ष आनंद खरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या मार्च मध्ये आंबेडकरी संविधान प्रेमी नागरिकांनी राष्ट्रध्वज तिरंगा हातात घेऊन घोषणाबाजी करुन हाथरस च्या घटनेचा निषेध केला प्रचन गर्दीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात प्रसाद साळसकर प्रशांत भिसे किशोर संगारे आशोक वाघमारे अमित हिरवे विजय पवार ओमकार जयसवाल इत्यादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला सदर घटनेची चौकशी सवौच्य न्यायलयाच्या निवृत न्यायधिशाच्या देखरेखीखाली करावी आशी आग्रही मागणी रिपब्लिकन नेते मनोज भाई संसारे यांनी केली