(मुंबई) लौकडाऊनच्या काळात राज्यात अनुसूचित जाती जमाती, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ व त्यांच्या संरक्षणासाठी तसेच आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर अनु जाती जमाती अत्याचार प़तिबधंक कायद्यानुसार कारवाई करावी, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा,अनुसूचित जाती तसेच बौद्ध विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठीच्या शिष्यवृत्ती योजनेबाबत सुधारित परिपत्रक काढण्यात यावे व त्यात उत्पन्नाची मर्यादा रद्द करण्यात यावी,बढतीतील आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिनराहून खुल्या प्रवर्गातील अधिकारी कर्मचारी यांचे प्रमाणे अनुसूचित जाती जमाती तसेच भटक्या जाती विमुक्त जमातींच्या अधिकारी कर्मचारी यांना बढती देण्यात यावी असे परिपत्रक काढण्यात यावे, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करू नये, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पुरग़स्ताना तातडीने मदत करावी,महार वतनी जमीनीचे मोठ्या प्रमाणात गैरहस्तांतरण झाले आहे त्या गैरहस्तांतरीत जमीनी पुन्हा मुळ वतनदार यांना परत कराव्यात किंवा त्याचा योग्य मोबदला देण्यात यावा, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सन्मान योजनेअंतर्गत राज्यात किती कुटुंबाना जमीन वाटत करण्यात आले ,बेरोजगार युवकांना काम मिळावे यासाठी तातडीने उपाय योजना तयार करावी आदी विविध मागण्यांबाबत राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दि ७ सप्टेंबर २०२० रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय रिपब्लिकन पक्ष खोरिपच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने घेण्यात आला होता परंतु ऐनवेळी रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली होती तरीही रिपब्लिकन पक्ष खोरिप चे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेंद्र शेंडे यांच्या आदेशानुसार आज रिपब्लिकन पक्ष खोरिपच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने मुंबई येथे व राज्यातील विविध जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी बोलताना पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी सांगितले की राज्य सरकार आंबेडकरी जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे अन्याय अत्याचाराबाबत सरकारला गांभीर्य नाही सरकार जातीयवादी गुंडांना पाठिशी घालत आहे याबाबत राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी अन्यथा राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी माहिती रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस जीवन बागडे यांनी दिली आहे