दि.०९ सप्टेंबर २०२० रोजी राष्ट्रवादी भवन,मुंबई येथिल जनता दरबारात मा. खासदार सौ.सुप्रियाताई सुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. अजित दादा पवार साहेब, रायगडच्या पालकमंत्री कु.अदितीताई तटकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्यावतीने वाघिवली वाडा,पनवेल येथिल बुध्द लेणी नष्ट करणाऱ्या सिडको व संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. खासदार सुप्रियाताई सुळे यांनी व पालकमंत्री अदितीताई तटकरे यांनी त्वरित चौकशी चे आदेश दिले.
वाघीवली वाडा (ओवळे),ता.पनवेल,जिल्हा रायगड येथिल बुध्द लेणी सर्वे क्र.१९३ दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजी रात्रीच्या आंधारात लेणीच्या आतील बुध्द मुर्ती आणि इतर पुरातत्वीन अवशेष सिडकोचे अधिकारी व नवी मुंबई विमानतळ सपाटीकरण करण्यासाठी नेमलेले ठेकेदार यांच्या संगनमताने चोरुन नेले व सदर लेणी नष्ट करण्यात आली. त्या संदर्भात दिनांक ०८.०९.२०२० रोजी वरिष्ठ पोलीस निरिक्षक,पवनेल शहर पोलिस ठाणे येथे सिडको व संबंधित ठेकेदार यांच्या विरुध्द तक्रार दाखल करण्यात आली. सदर निंदणीय घटनेची महाराष्ट्रातुन व देशातून आंबेडकरी जनतेकडून, विविध संघटनेकडून तीव्र निषेध व्यक्त होत आहे. या निंदणीय घटनेची चौकशी करावी. संबंधितावर कार्यवाही करावी.तसेच सदर जागेवर आपण भेट दयावी हि विनंती पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री.किशोर देवधेकर सर यांनी केली.
सोबत गणेश पाटील, राष्ट्रवादी जेष्ठ नागरिक सेल प्रमुख भाऊसाहेब लबडे, प्रभाग ५ अध्यक्ष, खारघर राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष प्रदिप पाटील आदी उपस्थित होते.