मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धमकी मग शरद पवार साहेब यांना धमकी,मग गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकी दिली जाते आणि ती ही राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना हा काय प्रकार आहे राज्यातील जनतेला सरकार मुर्ख समजते काय ? अधिवेशनाच्या निमित्ताने महत्त्वाचे विषयावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत कंगना राणावतवर बोलण्यापेक्षा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अरविंद बनसोड हत्याप़करणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य व आरोपी मयुरेश उमरकर यांच्यावर काय कारवाई केली आहे पिंपरी-चिंचवड येथील पिंपळे सौदागर येथील विराज जगताप ह्या तरुणाला दगडाने ठेचून खून केला ह्या घटनेतील आरोपींना अटक केली आहे काय? राज्यात अनुसूचित जाती जमाती, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपींवर काय कारवाई केली हे माध्यमातून सांगितले तर ते अधिक चांगले होईल उपराजधानी नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी एका दुरदर्शनच्या वाहिनीवर प्रसारित करण्यात आली होती त्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,शरद पवारसाहेब, गृहमंत्री अनिल देशमुख यांना धमकी दिली जाते राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे का?असा प्रश्न उपस्थित होतो आहे याची जबाबदारी घेऊन ,जनाची नाही तर मनाची लाज शिल्लक असेल तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्ष खोरिप चे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेंद्र शेंडे यांनी केली आहे युती सरकारच्या काळात गृहमंत्री राहिलेले दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी दाऊदच्या मुसक्या बांधून भारतात परत आणू असे आव्हान दिले होते मात्र आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनाच धमकी दिली जाते हे स्वत: चे रक्षण करु शकत नाही तर जनतेचे संरक्षण कधी करणार आहे हा प्रश्नच आहे असे मा आ उपेंद्र शेंडे यांनी पुढे म्हटले आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी दिली आहे
कंगना राणावत पेक्षा सरकारकडे महत्वाचा विषय नाही का - माजी आमदार उपेंद्र शेंडे यांच्या सरकारला खोचक सवाल
• Mukesh shinde