पालकमंत्रांच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाला आली जाग, तळोजा भुयारी मार्गाच्या कामाला पुन्हा वेग !

 


 


पनवेल, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे यांच्या आदेशानंतर झोपी गेलेल्या रेल्वे अधिकाऱ्यांना जाग आली. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर खडबडून जागे झालेल्या रेल्वे प्रशासनाने तळोजा रेल्वे भुयारी मार्गाचे काम पुन्हा सुरू केले.


अनके वर्षे झाली तरी तळोजा भुयारी मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. मागील अनेक महिन्यांपासून येथील काम रखडले होते. पावसाळ्यात तर येथे नदीचे रूप धारण झाले होते. मागील आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते फारुख पटेल आणि राष्ट्रवादी युवक पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष शहबाज पटेल यांनी पालकमंत्री अदिती तटकरे यांची मंत्रालयात भेट घेतली होती. पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे कामाला आरंभ झाला. तळोजा भुयारी मार्गाच्या कामासाठी अनेक सामाजिक नेत्यांनी पाठपुरावा केला आहे.