(मुंबई) कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लौकडाऊन सुरू आहे आपल्या राज्यात जून पासून अनलौक सुरू आहे राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशराज्य सरकारची दडपशाही, रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाला परवानगी नाकारलीन दि ७ व ८ सप्टेंबर २०२० असे दोन दिवस होणार आहे राज्यात लौकडाऊनच्या काळात अनुसूचित जाती जमाती, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ व त्यांच्या संरक्षणासाठी तसेच आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर अनु जाती जमाती अत्याचार प़तिबधंक कायद्यानुसार कारवाई करावी, उपराजधानी नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढत आहे राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे याची जबाबदारी घेऊन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अनुसूचित जाती तसेच बौद्ध विद्यार्थ्यांना परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठीच्या शिष्यवृत्ती योजनेबाबत सुधारित परिपत्रक काढण्यात यावे व त्यात उत्पन्नाची मर्यादा रद्द करण्यात यावी,बढतीतील आरक्षणाबाबत राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले आहे मा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिनराहून खुल्या प्रवर्गातील अधिकारी कर्मचारी यांचे प्रमाणे अनुसूचित जाती जमाती तसेच भटक्या जाती विमुक्त जमातींच्या अधिकारी कर्मचारी यांना बढती देण्यात यावी असे परिपत्रक काढण्यात यावे, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करू नये अतिवृष्टीमुळे तसेच पूरग्रस्तांना तातडीने मदत करावी आदी विविध प़श्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पक्ष खोरिपच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने दि ७ सप्टेंबर रोजी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंबई येथे आझाद मैदानावर तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र सरकार कोरोनाच्या नावाचा वापर करून राज्य सरकारने दडपशाही सुरू केली आहे त्यामुळेच मुंबई येथे आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी नाकारण्यात आली आहे तसेच विविध जिल्ह्यांत सुद्धा उपोषणाला परवानगी नाकारली आहे त्यामुळे सरकारच्या ह्या जातीयवादी भूमिकेचा रिपब्लिकन पक्ष खोरिपच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने निषेध करण्यात येत आहे गणेश उत्सवाच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी राज्यात सर्वत्र बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती गोपीनाथ पडळकर यांचे विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले, तसेच काल परवा अभिनेत्री कंगना च्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन झाले मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष केले होते मात्र राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन होऊ नये म्हणून आंदोलनाला परवानगी नाकारली गेली आहे सरकार अनुसूचित जाती जमाती, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे परवानगी नाकारली तरी मुंबई येथे व राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने निवेदन देण्यात येईल असे आदेश मा आ उपेंद्र शेंडे यांनी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना दिले आहेत अशी माहिती रिपब्लिकन पक्ष खोरिप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी दिली आहे
राज्य सरकारची दडपशाही, रिपब्लिकन पक्षाच्या आंदोलनाला परवानगी नाकारली
• Mukesh shinde