(प्रतिनिधी) रायगड जिल्हाच्या पालकमंत्री ना. आदिती सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खारघर यांच्या मागणी व विनंतिनुसार खारघरच्या नागरी विकास कामाना मोठ्या प्रमाणात चालना दिली असून पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त श्री सुधाकर देशमुख यांना त्या संबधिचे सुचना वजा प्रशासकीय आदेश जारी केले आहे
पांडवकडा धबधबा हा खारघरचा नैसर्गिक सौंदर्याचा अनोखा अविष्कार समजला जातो पावसाळ्यात याचे सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालत असते महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून विकास करावा त्याला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा व त्या माध्यमातून स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा अशी खारघर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आग्रही मागणी पालकमंत्रानी त्वरित मंजूर केली असल्याचे कळते यामुळे पालकमंत्र्यानी खारघरचे पालकतत्व स्वीकारले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे मंत्रालयात पालकमंत्र्याना भेटलेल्या शिष्टमंडळात बळीराम नेटके अजिनाथ सावंत सरवर कुमार व विलास खारटमोल इत्यादी पदाधिकार्यांचा प्रामुख्याने समावेश होता