खारघर पत्रकारांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादी काँग्रेसचे सेनिट्रायझर संरक्षण

(प्रतिनिधी) करोना लाॅकडाऊन काळात सेनिट्रायझर हे अत्येत गरजेचे व अत्यावश्यक बनले आसून प्रसार माध्यमातील पञकार पूर्णवेळ बातमी संकलनाचे काम अविरतपणे करत असतात त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना ह्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून खारघर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पार्थ दादा फाऊंडेशन च्या वतीने मूबलक सॅनिट्रायसर कॅन चे वाटम रविवार दिनांक १६ आॅगस्ट २०२० रोजी करण्यात आले. स्वप्नपूर्ती सोसायटी सेक्टर ३६ खारघर येथून या कार्यक्रमाची सुरुवात झाली ज्येष्ठ पत्रकार आणि खारघर प्रेस क्लब चे अध्यक्ष मुकेश शिंदे पञकार संतोष वाव्हळ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व रहिवासी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर दिनी १५५ लिटर सॅनिट्रायसर कॅन चे वाटप करण्यात आले रायगडाच्या पालकमंत्री ना.आदिती तटकरे यांच्या सुचनेनुसार शहर अध्यक्ष बळीराम नेटके व त्यांच्या सहकारी पदाधिकारी यांनी गेल्या महिन्यातील पावसात जलमय झालेल्या स्वप्नपूर्ती संकुलाच्या सदय परीस्थितीचा आढावा घेतला व पाहणी केली व पालकमंत्र्यांच्या माध्यमातून येथील जन समस्या सिडको प्रशासनाकडून सोडविण्याचाचे आश्वासन दिले. खारघर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पार्थ फाऊंडेशन सर्व सामान्यांच्या प्रश्नांवर मोठ्या प्रमाणात कार्यरत झाली असून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत भाऊ पाटील युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल मनपा नगर सेवक विजय खाणावकर पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य बी. ए. पाटील व पनवेल शहर सहसचिव बबनराव पवार यांच्या सहकार्याने खारघर शहर अध्यक्ष बळीराम नेटके आणि महिला अध्यक्षा राजश्री कदम यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पनवेल शहर जिल्हा युवक अध्यक्ष श्री प्रमोद बागल पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस अजिनाथ सांवत पनवेल शहर जिल्हा युवक कार्याध्यक्ष शेहबान पटेल, मोबन विलाम खारटमोल, विजय मयेकर, इम्रान सुभेदार, डॉ सुनंदा कुंभारे इत्यादी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाचे खारघर मध्ये सगळीकडे कौतुक होत आहे. खारघर वासियांनी पार्थ फाऊंडेशनचे आभार व्यक्त केले