वृत्तपत्र संपादक,मालक आणि पत्रकार यांनी हिटलरशाही विरुद्ध लढा उभारणे गरजेचे - भारतराज पवार
नुकतेच आर.एन. आय.कडून एक फर्मान निघाले की देशातील 1लाख 44हजार 893 वृत्तपत्रांना दंड आकारल्याची सामूहिक नोटीस RNI कार्यालयाच्या संकेतस्थळावर लावली असल्याचे कळते कारण काय तर वार्षिक विवरण न भरल्याने हि कारवाई आणि 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत मागील वार्षिक विवरण किंवा दंड न भरल्यास प्रेस व पुस्तक पंजीयन अधिनियम 1867 ( पी .आर.बी.ऍक्ट) कलम 19 नुसार कारवाई करण्यात येईल असे संकेत दिले आहेत
खरे तर भारतीय राज्यघटने नुसार वृत्तपत्रे लोकशाही चा चौथा आधार स्तंभ आहेत राज्यघटनेने कायद्याने सगळ्यांना अधिकार सारखेच दिले आहेत वृत्तपत्रांची जशी काटेकोरपणे अंमलबजावणी केंद्र सरकार करते तसेच काटेकोर पणे वृत्तपत्रांचा तसेच वृत्तपत्र संपादक,मालक ,पत्रकार यांचा मानसन्मान केला गेला पाहिजे वृत्तपत्र संदर्भातील केंद्र सरकारच्या नियमांचे , सूचनांचे परिपत्रक संपादक,मालक यांना कळविणे संबंधित अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे ते तर कधीच त्यानी पार पाडले नाही तर RNI कडून सुद्धा कधीही कसलाही योग्य खुलासा न करता किंवा संबधीत वृत्तपत्र मालक किंवा संपादक यांचे म्हणणे न ऐकता एकतर्फे निर्णय घेऊन अनेक वृत्तपत्र ( डी ब्लॉक) बंद करण्यात आली ही योग्य नाही ही तर हुकूमशाही अर्थात हिटलर शाही असून या विरोधात महाराष्ट्र सह देशातील अनेक पत्रकार संघटना,पत्रकार-मीडिया फाउंडेशन,असोसिएशन आदी सगळ्यांनी एक होऊन लढा दिला तरच वृत्तपत्रांचे कल्याण होणार नाहीतर हे शासन पत्रकारांनाच पाणी पाजून पाणी भरायला लावणार यात तिळमात्र शंका नाही जो आमचेच उदो उदो करेल त्यांचेच वृत्तपत्र चालू राहील असाच काहीसा प्रकार ह्या शासनाचा आहे जे साप्ताहिक वृत्तपत्र आहेत त्यांना सुरू होऊन 10 वर्षाच्या पूढील वर्ष झालीत तरी केंद्र किंवा राज्यशासनाच्या सरकारी जाहिराती कधी दिल्या नाहीत ,शासनाचा कसलाही लाभ नाही तरीही पोट तिडकीने का होईना अशी साप्ताहिक कसे तरी तग धरून आहेत चालू आहेत तर त्यातही शासन अशी बेजबाबदार पणे नोटीस बजावून कारवाई करणार हे घटने विरोधी तर आहेच परंतु हा खूप मोठा अन्याय असून या केंद्र सरकारच्या
संबंधित कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या ,अधिकाऱ्याच्या मनमानी विरोधात आमची प्रेस संपादक व पत्रकार संघटना नासिक, मुबंई सगळ्या पत्रकारांसाठी आवाज उठविणार आहेच परंतु देशभरातील आणि महाराष्ट्रातील अनेक पत्रकार संघटना,फाउंडेशन , असोसिएशनचे संस्थापक,अध्यक्ष, पदाधिकारी यांनी एकत्र येऊन आपला आवाज,आपली ताकद विशेषतः कलम की ताकद दाखविणे गरजेचे झाले आहे तरच आपला कलम आपल्या हाती राहील तरच आपणास स्वातंत्र्य राहील नाहीतर आपले स्वातंत्र्य , आपला कलम केंद्र सरकारने हिसकावून घेल्यातच जमा आहे हे टाळून चालणार नाहीच वेळ गेली नाही म्हणून जागे व्हा मान-पान, भेद भाव सगळे विसरून एक व्हा आणि सगळ्यांनी लढा देण्यास एकत्र या.
- भारतराज पवार
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
- अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समिती
*नासिक जिल्हा कार्याध्यक्ष -
- प्रेस संपादक व पत्रकार संघ,महाराष्ट्र
9158417131
वृत्तपत्र संपादक,मालक आणि पत्रकार यांनी हिटलरशाही विरुद्ध लढा उभारणे गरजेचे - भारतराज पवार
• Mukesh shinde